Sunday, September 20, 2026
Homeखानदेशबहिणाबाई महोत्सवात रविवारी गर्दीचा उच्चांक !

बहिणाबाई महोत्सवात रविवारी गर्दीचा उच्चांक !

बहिणाबाई महोत्सवात रविवारी गर्दीचा उच्चांक !

लावणीसह भरतनाट्यम नृत्य पाहण्यासाठी जळगावकरांची उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी सागर पार्क येथे भरारी फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सवात रविवारी जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून महाराष्ट्रीयन लावणी आणि भरतनाट्यम नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी लावणी महाराष्ट्राची हा शाहीर मीरा दळवी व सहकाऱ्यांनी सादर केला तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा भारत गौरव पर्व हे कार्यक्रम रविवारी जळगावकर रसिकांच्या खास पसंतीचे ठरले,

या बहिणाबाई महोत्सवामध्ये दलिचंद जैन, रजनीकांत कोठारी यांना जीवनगौरव पुरस्कार तर वैद्यकीय सामाजिक व औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ, प्रसन्न कुमार रेदा सनी डॉ. नंदा जैन, डॉ. पी. आर चौधरी, भालचंद्र पाटील, अनिल कांकरिया यांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, भालचंद्र पाटील, सचिन महाजन, सागर पगारीया, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, अभिषेक बोरसे, विक्रांत चौधरी, आकाश भावसार, मंगेश पाटील आदींची उपस्थिती होती.

आज सोमवारी सायंकाळी समारोप
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी शाहीर सुमित धुमाळ यांच्या शाहीर महाराष्ट्राचा प्राण या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवसीय महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप होईल असे दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांनी सांगितले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या