Sunday, October 5, 2025
Homeखानदेशखेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी I शेतामध्ये काम करीत असलेल्या एका शेतकऱ्याला सर्प चावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे 24 जानेवारी रोजी घडली,रामा बळीराम ढमाले (पाटील, वय ४७) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जानेवारी रोजी शेतकरी रामा ढमाले हे त्यांच्या  पत्नी व मुलगा सोबत त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांना काहितरी चावल्यासारखे जाणवले. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या पत्नीस सांगितली. त्यानंतर त्यांना नातेवाईक असलेल्या श्रीराम ढमाले यांच्या मदतीने घरच्या मंडळींनी घेऊन उपचारासाठी नेत असताता त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

मृत रामा ढमाले यांच्या पश्चात पत्नी, आई, २ मुले, सुन असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खेडगाव नंदीचे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या