Sunday, September 20, 2026
Homeशैक्षणिकविद्यापीठात युवती महासभेचा समारोप

विद्यापीठात युवती महासभेचा समारोप

विद्यापीठात युवती महासभेचा समारोप
जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या युवती महासभेचा समारोप मोठ्या उत्साहात झाला.

दि. १७ ते २३ जानेवारी पर्यंत झालेल्या या युवती सभेत महिला सशक्तीकरण, सबलीकरण व आत्मनिर्भरता यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. चेतना नन्नवरे व सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महासभेचे उद्घाटन झाले. दि. १८ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या उद्यान निरीक्षक अश्विनी पाटील यांनी कुक्कुट पालन, पशपालन यामधील करीअरच्या संधीबाबत मार्गदर्शन केले.

दि. २२ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात युवतींची आरोग्य तपासणी करण्यात आली. दि. २३ जानेवारी रोजी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या उपस्थितीत या युवती महासभेचा समारोप झाला. प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. या समारंभात प्रा. रमेश सरदार, डॉ. आर.आर. चव्हाण, प्रा. अश्विनी मुंदडा, डॉ. अनिल बारेकर व विभागातील विद्यार्थिनी उपस्थिती होत्या.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या