Saturday, May 2, 2026
HomeBlogशाळेला चांगला शेरा मिळावा यासाठी मागितली शिक्षकाकडून १ हजाराची लाच

शाळेला चांगला शेरा मिळावा यासाठी मागितली शिक्षकाकडून १ हजाराची लाच

शाळेला चांगला शेरा मिळावा यासाठी मागितली शिक्षकाकडून १ हजाराची लाच

पिंपळकोठा येथील जि .प. शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक ; जळगाव एसीबीचे कारवाई

जळगाव प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील शाळेची शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून शाळेला चांगला शेरा मिळावा यासाठी शिक्षकाकडून एक हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बळीराम सुभाष सोनवणे वय 55 असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.

पिंपळकोठा येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असलेले तक्रारदार यांनी बळीराम सोनवणे यांनी संशयित शिक्षण विस्तार अधिकारी जी डी पाटील यांनी गेल्या सोमवारी शाळेचे इन्स्पेक्शन केले असल्याने त्यांनी चांगला शेरा द्यावा यासाठी दहा हजार रुपये मागितले असून मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांनी शाळेच्या प्रत्येक शिक्षकाकडून एक हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये ची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार शिक्षकांनी जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिली होती. आज सोमवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचून बळीराम सोनवणे याला १ हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले, दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी यांची एसीबीने फोन द्वारे पडताळणी केली असता त्यांनी दोन हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही आणि नंतर कॉल करतो असे सांगून अधिक संभाषण करणे टाळत फोन ठेवून दिला. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात बळीराम सोनवणे आणि पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे डी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यांनी केली कारवाई
एसीबी चे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने केली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या