Thursday, May 7, 2026
Homeदेश विदेश'इमर्जन्सी' चित्रपटातून आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा- देवेंद्र फडणवीस

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा- देवेंद्र फडणवीस

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा- देवेंद्र फडणवीस

मुंबई: ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून, या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

इमर्जन्सी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. या वेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

की, आणीबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र, ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन फडणवीस या वेळी केले. अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या