Saturday, August 2, 2025
Homeक्राईमबिदरमध्ये एटीएमवर दरोडा गोळीबार करत ९३ लाखांची रोकड पळवली

बिदरमध्ये एटीएमवर दरोडा गोळीबार करत ९३ लाखांची रोकड पळवली

महाकुंभचा महाआरंभ !बीदर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कर्नाटकातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीदर शहरातील गजबजलेल्या शिवाजी सर्कल येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये रोकड भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेछूट गोळीबार करत दरोडेखोरांनी ९३ लाख रुपये रकमेची पेटी पळवल्याची रक्तरंजित घटना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन कर्मचारी जागीच मृत्यू पावले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने बीदर जिल्हा हादरला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे सूत्रे गतिमान केली असून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

बीदर शहरातील शिवाजी सर्कल येथे एसबीआय बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एटीएमचे कर्मचारी हे एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्यासाठी आले होते. मशीनमध्ये रोकड भरण्यापूर्वी दुचाकीवर आलेल्या दोघांनी या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि गोळीबार केला. विशेष म्हणजे यावेळी कर्मचाऱ्यांबरोबर बंदूकधारी सुरक्षारक्षक नव्हता. या हल्ल्यामध्ये दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये व्यंकटेश गिरी (४०) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शिवकुमार (२६) याचा उपचारासाठी हैदराबादकडे नेत असताना मृत्यू झाला, तर

जखमी असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकारानंतर हल्लेखोरांनी ९३ लाखांची बंग मात्र सोडली नाही. पेटी घेऊन दुचाकीस्वारांनी पळ काढला. सर्व घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या थरारक घटनेमुळे शिवाजी सर्कल परिसरात बध्यांची एकच गर्दी झाली होती. पोलीस अधीक्षकांनी घटनेची माहिती घेऊन चोरट्यांच्या मागावर तीन पथके रवाना केली. दिवसाढवळ्या अशाप्रकारे दरोडेखोरांनी हल्ला केल्याने बीदरमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. २४ तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तर घटनेदरम्यान, एटीएमचा सुरक्षारक्षक कुठे होता? असाही प्रश्न विचारला जात आहे

ताज्या बातम्या