Thursday, April 30, 2026
Homeक्राईमतीन हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले !

तीन हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले !

कुसुंबा येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी :-सातबारा उताऱ्यावर आई आणि भावाचे नाव लावण्यासाठी प्रथम पाच नंतर चार आणि तडजोडी अंती तीन हजाराची लाच स्वीकारताना कुसुंबा येथे आज मंगळवार 7 रोजी सायंकाळी तलाठ्याला जळगावच्या एसीबीने अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.नितीन शेषराव भोई (वय ३१ वर्षे) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदाराने त्यांचे आई व भावाचे नाव सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र यासाठी  तलाठी नितीन शेषराव भोई याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे 7 जानेवारी रोजी केली होती. या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तलाठी नितीन भोई याने सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी सुरुवातीला पाच हजार तर नंतर चार व तडजोडी अंति 3 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार आज 7 जानेवारी रोजी तलाठी नितीन भोई हा तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई

ही कारवाई  पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या