Thursday, May 7, 2026
Homeक्राईमजळगाव शहरातील तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव शहरातील तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव : विविध पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील तीन अट्टल गुन्हेगारांवर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय २३), पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २३) व आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे (वय २२, सर्व रा. तुकारामवाडी) असे तिघांची नावे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारांची संख्या वाढली असून ह्या गुन्हेगारांवर वचक बसावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर पावले उचलली आहेत. तुकाराम वाडी वाडी परिसरातील आकाश उर्फ खंड्या ठाकूर याच्यावर सात, पवन उर्फ बद्या बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश उर्फ आक्या ब्रो मराठे याच्याविरुद्ध खूनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला होता.

त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी  तिघांच्या हद्दपारीचे आदेश पारित होताच, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहूल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या