Thursday, April 30, 2026
Homeताज्या बातम्याचीनने बनवलेल्या जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनने गाठला ४५० किमीचा वेग

चीनने बनवलेल्या जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनने गाठला ४५० किमीचा वेग

बीजिंग वृत्तसंस्था:  जगातील सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेन चीनने बनवली आहे. ही रेल्वे ताशी ४५० किमी वेगाने धावू शकते. रविवारी या रेल्वेचे मॉडेल जगाला दाखवण्यात आले.

सध्या चीनमध्ये ताशी ३५० किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. सीआर ४०० असे या रेल्वेचे नाव आहे. नव्या रेल्वेचे सीआर ४५० असे नामकरण करण्यात आले आहे. या रेल्वेने चाचणीत वेग, विजेचा वापर, अंतर्गत आवाज आणि ब्रेकिंग यंत्रणा या निर्देशांकांवर नवी आंतरराष्ट्रीय मापदंड स्थापन करणारी कामगिरी केल्याचे चीनच्या रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जगातील ही वेगवान रेल्वे अजून काही चाचण्यांनंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. यामुळे प्रवासाचा वेळ

वाचेल, कनेक्टिव्हिटी सुधारेल, असे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये सध्या हाय स्पीड रेल्वेचे ४७ हजार किमीचे मार्ग आहेत. देशातील प्रमुख शहरांना या हायस्पीड रेल्वे नेटवर्कने जोडण्यात आले आहे. हायस्पीड रेल्वे नेटवर्क तोट्यात असले तरी देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व औद्योगिक विकास

यांमध्ये या नेटवर्कची मोठी भूमिका असल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनमध्ये सध्या बीजिंग शांघाय मार्गावरील बुलेट ट्रेन सेवाच फायद्यात आहे. उर्वरित शहरांदरम्यानची बुलेट ट्रेन सेवा तोट्यात आहे. अलीकडे चीनने धायलंड, इंडोनेशियाला बुलेट ट्रेनची निर्यात केली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या