Friday, May 1, 2026
Homeक्राईमकार झाडावर आदळली! ; तीन तरुण ठार, दोन जखमी

कार झाडावर आदळली! ; तीन तरुण ठार, दोन जखमी

जळगाव:-भुसावळ येथून मित्राच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पाच मित्रांच्या कारला भीषण अपघात होऊन या अपघातात रावेर येथील तीन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज 20 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. यात अन्य दोन मित्र जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुभम दशरथ सोनार (वय २५, रा. नाला परिसर, रावेर), मुकेश किशोर रायपुरकर (वय २३, रा. गांधी चौक, रावेर) आणि जयेश केशव भोई (वय २२, रा. भोईवाडा, रावेर) असे मयत युवकांची नावे आहेत. गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा), आणि विकी उदय जाधव (वय २५, रा.स्टेशन रोड, रावेर) असे जखमी युवकांची नावे आहेत.

या बाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शुभम सोनार मुकेश रायपुरकर जयेश भाई गणेश भोई आणि विकी जाधव हे पाच युवक रावेर येथील रहिवासी असून ते भुसावळ येथे एका मित्राच्या बहिणीच्या हळदी कार्यक्रमासाठी आले असताना ते परतत असताना त्यांचे (वाहन क्रमांक एम एच 20 सी एस 80 02) ही एका झाडावर नियंत्रण सुटल्याने आज 20 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचे सर्वत्र तुकडे विखुरले गेले. या अपघातात वरील तीन युवक मयत तर दोन युवक जखमी झाले. जखमींवर खाजगी आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे रावेर शहरात शोककळा पसरली आहे.

मयत शुभम दशरथ सोनार याला आई-वडील, तीन बहिणी असा परिवार असून तीन बहिणींच्या पाठीवरील तो एकुलता एक होता. जयेश केशव भोई याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
मुकेश किशोर रायपूरकर याच्या मागे आई आणि बहीण आहे .

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या