Thursday, May 7, 2026
Homeक्राईमडंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार!

डंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार!

जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळील घटना

जळगाव प्रतिनिधी;- काम आटोपून घरी जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव वेगाने डंपर ने दिलेल्या धडकेत दोघे तरुण जागीच ठार झाल्याचे घटना आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील फुप नगरी येथे आज 19 रोजी घडली. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

पंकज शंकर कोळी (वय 26) आणि कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय 27 दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) अशी मयत तरुणांची नावे आहेत.
पंकज कोळी आणि अमोल कोळी हे दोन्ही जळगाव तालुक्यातील घार्डी येथील रहिवासी असून ते सेंट्रींग काम करून आपला उदरनिर्वाह करतात. आज 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक (एम एच 19 – एबी 34 46) ने कामे आटोपून घरी गावाकडे जात असताना डंपर (क्रमांक एमएच 19- झेड 8067) समोरून जोरदार धडक दिल्याने पंकज आणि अमोल हे दोघे ठार झाले. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी मदत कार्य केले.  पंकज कोळी यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार असून अमोल कोळी यांच्या पश्चात पत्नी दीड वर्षाची मुलगी व आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.  याबाबत उशिरापर्यंत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या