Thursday, May 7, 2026
Homeताज्या बातम्याप्रवासी बोटीला स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू

प्रवासी बोटीला स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू

मुंबई वृत्तसंस्था ;-एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवाशी बोटीला इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. त्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 101 जणांना वाचवण्यात यश आलं. नीलकमल नावाच्या बोटमधून प्रवाशी एलिफंटाकडे जात होते. त्यावेळी उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली.

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या