Tuesday, April 21, 2026
Homeक्राईमजिल्ह्यातील 14 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

जिल्ह्यातील 14 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

जिल्ह्यातील 14 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

एलसीबी चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी तर एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली

जळगाव प्रतिनिधी l जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी तर दुसरीकडे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) करण्यात आली आहे.

इतर बदल्यांमध्ये कावेरी कमलाकर यांची चोपडा ग्रामीणवरून शनिपेठ येथे, दत्तात्रय निकम यांची अमळनेरवरच कायम, रंगनाथ धारबळे यांची शनिपेठवरून यावल येथे, प्रदीप ठाकूर यांची यावलवरून जिल्हा पेठ येथे, सुनील पवार यांची पारोळ्यावरून नियंत्रण कक्षात, सोपनि प्रमोद कठोरे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून पहूर येथे, सोपनि जनार्दन खंडेराव यांची वरणगाववरून यावल येथे, सपोनि अमितकुमार बागुल यांची भुसावळ बाजारपेठेतून वरणगाव येथे, सपोनि प्रकाश काळे यांची पिंपळगाव हरेश्वरवरून जळगाव शहर येथे, सापोनि कल्याणी वर्मा यांची जळगाव शहरावरून पिंपळगाव हरेश्वर येथे, तर पोउनि सोपान गोरे यांची पाचोरावरून एलसीबी येथे बदली करण्यात आली आहे.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या