Friday, May 1, 2026
Homeखानदेशशहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमिन...

शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमिन प्रदान

शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमिन प्रदान

जळगाव– जम्मू-काश्मीरमध्ये २७ फेब्रुवारी २००० रोजी झालेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ दरम्यान शौर्याने लढत वीरमरण प्राप्त झालेल्या जवान राकेश काशिराम शिंदे (रा. कुर्‍हे पानाचे, ता. भुसावळ) यांच्या मातोश्री अनुसयाबाई काशिनाथ शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मांडवेदिगर (ता. भुसावळ) येथे २ हेक्टर शेतीयोग्य कृषी जमीन प्रदान करण्यात आली.

या प्रेरणादायी प्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते अधिकृत जमीन प्रदान आदेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहीद जवानांच्या कुटुंबासाठी शासन सदैव कृतज्ञ असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, “ही केवळ आर्थिक मदत नाही, तर त्यांच्या देशसेवेच्या त्यागाला कृतज्ञतेची भावांजली आहे.”

या वेळी भावना व्यक्त करताना वीरमाता अनुसयाबाई शिंदे म्हणाल्या, “माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, पण शासनाने त्याच्या बलिदानाची दखल घेतल्याचा अभिमान वाटतो. ही जमीन आम्हाला त्याच्या आठवणी जपण्यासाठी एक नवसंजीवनी ठरेल.”

कार्यक्रमाला तालुका प्रशासनाचे अधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या