Sunday, May 10, 2026
Homeक्राईमशहर पोलिसांची धडक कारवाई; गेंदालाल मिल परिसरातून दहशत माजविणाऱ्या टोळीची धिंड

शहर पोलिसांची धडक कारवाई; गेंदालाल मिल परिसरातून दहशत माजविणाऱ्या टोळीची धिंड

शहर पोलिसांची धडक कारवाई; गेंदालाल मिल परिसरातून दहशत माजविणाऱ्या टोळीची धिंड
जळगाव : जळगाव शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना शहर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. गेंदालाल मिल परिसरातून दोन गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसांसह एका कारमधून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. महत्त्वाचं म्हणजे, पोलिसांनी त्यांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली, जिथे ते दहशत पसरवत होते. या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं असून, भाईगिरी करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शनिवारी रात्री गस्त घालत असताना, शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गेंदालाल मिल परिसरात काही संशयित व्यक्ती दिसल्या. चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यांची झडती घेतली असता, एका आरोपीच्या कमरेला लोड केलेलं पिस्तूल सापडलं. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता, त्यात आणखी एक पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसं सापडली.
याप्रकरणी युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), सौहील शेख उर्फ दया सीआयडी (वय २९), निजामोद्दीन शेख (वय ३१) आणि शोएब शेख (वय २९) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
ज्या भागात ही टोळी दहशत माजवत होती, त्याच रस्त्यावरून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचं नागरिकांनी स्वागत केलं आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक वाढला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या