Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हारिपाइंतर्फे यावलचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे स्वागत

रिपाइंतर्फे यावलचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे स्वागत

रिपाइंतर्फे यावलचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे स्वागत

यावल (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) यावल तालुका कार्यकारिणीतर्फे नव्याने यावल पोलीस निरीक्षकपदी रुजू झालेले  रंगनाथ धारबळे यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र चिटणीस मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन रावेर-यावल विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर व यावल तालुका अध्यक्ष अरुण गजरे यांनी केले होते. या वेळी माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुयोग पातुडे, कमलाकर जाधव, सिद्धार्थ बोरेकर, नितीन बोरेकर, महेंद्र सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या स्वागत प्रसंगी श्री. धारबळे यांनी रिपाइं पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, “यावल शहरात कायदा व सुव्यवस्थेचा सन्मान राखण्यासाठी पोलिस विभाग सतत सज्ज राहील,” असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे संचालन संयोजक सिद्धार्थ बोरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कमलाकर जाधव यांनी केले.
कार्यक्रमाला अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली ., या स्वागत समारंभामुळे पोलीस व नागरिकांमध्ये परस्पर विश्वास आणि सौहार्द वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या