Thursday, May 7, 2026
Homeक्राईममेहरूण परिसरातून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद

मेहरूण परिसरातून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद

जळगाव प्रतिनिधी I एमआयडीसी पोलिसांनी मेहरूण परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन भामट्यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,दीपक दयाराम रूम (३४) व दीपक एकनाथ शैले (३१, रेणुकानगर, जळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या भामट्यांची नवे आहेत.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , मेहरूण परिसरात राहणाऱ्या सहाजीब हबीब खाटीक यांची दुचाकी (एम.एच.१९ एआर ५३४७) ही ११ जानेवारी रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेल्यावर त्यांनी याबाबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दीपक रम आणि दीपक शैले या दोघांना अटक करण्यात आली आहे .

हि कारवाई एमआयडीसी निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश ठाकरे, अफजल बागवान व शनिपेठचे अनिल कांबळे व पराग दुसाने आदींच्या पथकाने केली.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या