Monday, June 22, 2026
Homeक्राईममन्यारखेडा येथे बैल बांधण्यावरून तिघांना बेदम मारहाण

मन्यारखेडा येथे बैल बांधण्यावरून तिघांना बेदम मारहाण

मन्यारखेडा येथे बैल बांधण्यावरून तिघांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील मन्यारखेडा येथे बैल बांधण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला ४ जणांनी लोखंडी वस्तू डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली, तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोन जणांना देखील मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वर रमेश मराठे (वय-४२), रा. मन्यारखेडा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांचा बैल बांधण्याच्या कारणावरून गावात

राहणारे निंबाजी पजई, सुरेश पजई, सुरेश भराडे आणि हिरामण भराडे या चौघांनी लोखंडी वस्तू डोक्यात टाकून मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले योगेश निंबाळकर आणि दिलीप निंबाळकर यांना देखील लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी ज्ञानेश्वर मराठे यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता संशयित आरोपी निंबा पजई, सुरेश पजई, सुरेश भराडे, हिरामण भराडे (सर्व रा. मन्यारखेडा) या चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे करीत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या