Monday, June 22, 2026
Homeक्राईमपुणे बलात्कार प्रकरण : अखेर नराधम दत्तात्रय गाडे याला अटक

पुणे बलात्कार प्रकरण : अखेर नराधम दत्तात्रय गाडे याला अटक

पुणे बलात्कार प्रकरण : अखेर नराधम दत्तात्रय गाडे याला अटक

पुणे वृत्तसंस्था

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. नराधम दत्तात्रय हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसला होता. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी 13 टीम तयार केल्या होत्या, तसेच गावात 100 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने कसून शोध घेतल्यानंतर तब्बल 48 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

दत्तात्रय गाडे हा एका कॅनॉलच्या खड्ड्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल दिवसभर ड्रोनच्या माध्यमातून शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र, रात्री 11:45 च्या सुमारास तो पाणी पिण्यासाठी एका घरात गेला. त्या घरातील महिलेने तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी आरोपीला चारही बाजूंनी घेरले. यानंतर मध्यरात्री 1:20 वाजता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असून, आज सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या