Wednesday, April 29, 2026
Homeखानदेशपहलगाम हल्ल्यातील चार पार्थिवांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली...

पहलगाम हल्ल्यातील चार पार्थिवांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली 

पहलगाम हल्ल्यातील चार पार्थिवांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली 

जळगाव प्रतिनिधी जम्मू व काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात  महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे पार्थिव हवाई मार्गे मुंबईला आणण्यात आले.


पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमानतळ येथे आलेल्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

उर्वरित दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेत अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले,दिलीप देसले यांचा पार्थिव आणले आहेत. जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क करण्यात आला असून ते सुखरूप असल्याचे सांगितले आहे. जम्मू व काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या