Thursday, May 7, 2026
Homeक्राईमनवीन मोबाईल घेऊन परतणाऱ्या सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू; परिसरात शोककळा

नवीन मोबाईल घेऊन परतणाऱ्या सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू; परिसरात शोककळा

चोपडा प्रतिनिधी I नवा मोबाईल घेऊन परतणाऱ्या वर्डी येथील दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला आहे. टेमरया उर्फ रगन जगन बारेला (वय १८) आणि मगन जगन बारेला (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत.

​चोपडा येथून दुचाकीने (एमएच १९, एव्ही ८५८२) घरी परत येत असताना, माचला फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगातील क्रेटा कारने (एमएच ०४, एचएफ ८२९६) धडक दिली.

​या अपघातात मगन बारेला यांचा जागीच मृत्यू झाला, तर टेमरया बारेला यांचा उपचारादरम्यान चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील कारवाई अडावद पोलीस करत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या