Thursday, July 31, 2025
Homeक्राईमधूम स्टाईलने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या; चोरटे सीसीटीव्हीत कैद

धूम स्टाईलने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या; चोरटे सीसीटीव्हीत कैद

धूम स्टाईलने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरात ‘धूम स्टाईल’ने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी दिवसाढवळ्या हिसकावून नेल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना १ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली असून, दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

पहिली घटना प्रेमनगर परिसरातील मंदिराजवळ घडली. पूजा मनोज चांडक (वय ४२, रा. प्रेमनगर) या मॉर्निंग वॉक करत असताना, एक चोरटा त्यांच्या दिशेने पायी आला आणि गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून घेतली. यानंतर तो जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून दुसऱ्या साथीदारासह घटनास्थळावरून फरार झाला.

त्याच दिवशी काही अंतरावर फॉरेस्ट कॉलनी परिसरात संगीता राजेश कडे (वय ५२, रा. बहिणाबाई बगीचाजवळ) या महिलेलाही लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळीही असाच प्रकार करत चोरट्यांनी लंपास केली.

घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला आहे. फुटेजमध्ये दोन्ही चोरटे स्पष्टपणे दिसत असले तरी, वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट  आहे.

या प्रकारामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या