Thursday, May 7, 2026
Homeक्राईमदारूच्या नशेत पत्नीचा खून; फरार आरोपीला पुण्यातून अटक

दारूच्या नशेत पत्नीचा खून; फरार आरोपीला पुण्यातून अटक

दारूच्या नशेत पत्नीचा खून; फरार आरोपीला पुण्यातून अटक

वरणगाव: कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या करून फरार झालेल्या अजीज सलीम शेख (वय ३५, रा. परळी, जि. बीड) याला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. रविवारी मध्यरात्री वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर ही घटना घडली होती.

अजीज शेख याला दारूचे गंभीर व्यसन होते. तो पत्नी सना शेख (वय २५) हिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत असे. शनिवारी दिवसभर त्याने मद्यप्राशन केले. रात्री सव्वाआठच्या सुमारास वीटभट्टीवर परतल्यानंतर पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून अजीजने संतापाच्या भरात पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

रविवारी सकाळी सना खोलीबाहेर न आल्याने तिचा भाऊ अझहर शेख यांनी खिडकीतून पाहिले असता ती हालचाल न करणाऱ्या अवस्थेत आढळली. कुटुंबाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सनाच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसून आले. तातडीने तिला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अखेर पुण्यात मिळाला ठावठिकाणा

खून करून फरार झालेल्या अजीज शेखचा शोध घेण्यासाठी वरणगाव पोलिसांनी तपास सुरू केला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून शोध घेत मंगळवारी दुपारी त्याला पुण्यात अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वरणगाव पोलीस करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या