Thursday, July 31, 2025
Homeक्राईमथरार ! भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅक्टर ओढत नेल्याने झाले...

थरार ! भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅक्टर ओढत नेल्याने झाले पलटी !

थरार ! ; भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅक्टर ओढत नेल्याने झाले पलटी !

तरुणाचा दाबला गेल्याने  मृत्यू ; तीन जण गंभीर ,दूध फेडरेशन जवळील घटना

सुदैवाने शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले

जळगाव I प्रतिनिधी
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपर चालकाने डंपर वेगात हाकून यात विटांनी भरलेला ट्रॅक्टर थोड्या अंतरावर ओढत नेऊन पलटी झाल्याची घटना आज सकाळी १० अवजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील दूध फेडरेशनजवळ घडली .

या घटनेत एका तरुण कामगाराचा ट्रॅक्टरखाली आल्याने दाबून मृत्यू झाला . तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली .मात्र याच वेळी सुदैवाने थोड्याच अंतरावर असलेलले शालेय विद्यार्थी जाण्याच्या बेतात असताना त्यांना आवाज आल्याने ते माघारी फिरल्याने बचावले. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी शहर पोलिसांनी डंपर ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. अंकुश आत्माराम भिल वय 27 असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील दूध फेडरेशन परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपा जवळ विटा घेऊन जाणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ ए एन २९०६ ला ओव्हरटेक करण्याच्या नादात असणाऱ्या डंपरने कट मारल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या ट्रॅक्टरवर मजूर असलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली आल्यामुळे तो जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असणारे इतर सुनील मधुकर भिल वय 22 , गणेश भगीरथ भिल वय 18 आणि शुभम सुखाभिल वय तिघे राहणार इदगाव हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळतच घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन डंपर ताब्यात घेतला. मयत अंकुश यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान या घटनेबाबत उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या