Friday, May 1, 2026
Homeखानदेशजिल्हा स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत माझं शेख हिचे यश

जिल्हा स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत माझं शेख हिचे यश

जिल्हा स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत माझं शेख हिचे यश

जळगाव प्रतिनिधी

इकरा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरून, जळगाव येथील एफ. वाय. बी.एस.सी. मधील विद्यार्थिनी शेख बुशरा नाज मुनाफ हिने जिल्हा स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत तिच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल तिला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

ही स्पर्धा अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ, एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय, जळगाव यांनी आयोजित केली होती.

या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेश भामरे यांना दिले जात आहे.

इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार व सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान व संपूर्ण स्टाफने तिला यशस्वी कामगिरीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन दिले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या