Thursday, May 7, 2026
Homeक्राईमजळगाव जिल्ह्यातील दोन पोलिस निरीक्षकांची बदली; नवे अधिकारी कोण येणार याकडे लक्ष

जळगाव जिल्ह्यातील दोन पोलिस निरीक्षकांची बदली; नवे अधिकारी कोण येणार याकडे लक्ष

जळगाव जिल्ह्यातील दोन  पोलिस निरीक्षकांची बदली; नवे अधिकारी कोण येणार याकडे लक्ष

जळगाव (प्रतिनिधी) – पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्यापही सुरूच असून, नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जारी केले आहेत. विशेष म्हणजे, या यादीत जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यातच पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसामान्य व विनंती बदल्या पार पडल्या होत्या. मात्र काही निरीक्षकांनी केलेल्या विशेष विनंत्यांचा विचार करून हे ताजे आदेश काढण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते.

बदल्यांमध्ये नाशिक ग्रामीणचे हेमंतकुमार भामरे यांना त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात आले आहे. तसेच जळगाव येथील प्रदीप देशमुख यांची बदली नाशिक ग्रामीण विभागात करण्यात आली आहे. दुसरीकडे, चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचीही बदली नाशिक ग्रामीण विभागात झाली आहे. नंदुरबारचे हेमंतकुमार पाटील यांनाही त्यांच्या मूळ जिल्ह्यातच कार्यरत ठेवण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील दोन निरीक्षकांची बदली झाल्यामुळे आता या ठिकाणी कोणते नवीन अधिकारी नियुक्त होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात लवकरच काही नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या