Sunday, September 20, 2026
Homeक्राईमजळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह नऊ आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नती

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह नऊ आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नती

मुंबई / जळगाव : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती झाल्या आहे. यामध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची देखील पदोन्नती झाली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले.

गेल्या वर्षभरापुर्वी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्विकारला होता. त्यानंतर राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अहमदनगरचे

पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उप आयुक्त प्रवीण मुंढे, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते, नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबईचे उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञात व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा. आर., पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड प्राचार्य एन. टी. ठाकूर यांचा समावेश आहे. त्यांच्या पदोन्नतीचे आदेश गुरुवारी गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या