जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सवाला होणार प्रारंभ
खानदेशातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे दालन ठरणार आकर्षण
जळगाव I प्रतिनिधी
भरारी फाउंडेशनतर्फे बहिणाबाई महोत्सव फे २३ ते २७ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर होणार आहे. यंदा महोत्सवाचे १० वे वर्ष आहे. २३ जानेवारीस सायंकाळी सहाला अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते सागर पार्क मैदानावर उद्घाटन होईल. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, नाबार्डचे चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, भालचंद्र पाटील, उद्योगपती रजनीकांत कोठारी, डॉ. पी. आर. चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी आदींनी उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे दालन, तसेच वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने भव्य पुस्तकाच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. दि.२३ जानेवारीला ‘भारुडं प्रबोधनाचे, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, जागर लोककलेचातसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दि. २४ अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा ‘चला हवा करुया’ दि.२५ जानेवारीला ‘सप्तरंगी रे’ हे शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, दि. २६ रोजी शाहीर मीरा दळवी यांचा लावणी महाराष्ट्राची, दि.२७रोजी शाहीर सुमित दळवी यांचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच विविध खाद्यपदार्थांची मेजवानी याठिकाणी आहे