Sunday, October 5, 2025
Homeक्राईमचाळीसगाव: पोलिसांनी जप्त केला ४२ किलो गांजा, एकाला अटक; कन्नडमध्येही ४५० किलो...

चाळीसगाव: पोलिसांनी जप्त केला ४२ किलो गांजा, एकाला अटक; कन्नडमध्येही ४५० किलो जप्त

चाळीसगाव: पोलिसांनी जप्त केला ४२ किलो गांजा, एकाला अटक; कन्नडमध्येही ४५० किलो जप्त

चाळीसगाव: चाळीसगाव शहर पोलिसांनी ३० एप्रिल रोजी पहाटे मालेगाव रोडवरील धुळे-छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे नाकाबंदी दरम्यान २४ लाख ६९ हजार १५० रुपये किमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कार (MH 12 KN 2305) ची तपासणी केली असता, डिकीत निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा आढळला. या प्रकरणी शेख नदीम शेख बशीर (वय ४०, रा. गुलवानी खालदा, मालेगाव, जि. नाशिक) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तस्करीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.

तपासात कन्नड शहरातही गांजा साठवल्याची माहिती मिळाल्याने कन्नड पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४५० किलो गांजा जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या