Thursday, May 7, 2026
Homeक्राईमखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जळगावातून अटकेत

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जळगावातून अटकेत

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जळगावातून अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सुमारे तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जळगाव पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

चंदानगर पोलिसांचे पथक आरोपी अझहर खाटीकच्या शोधासाठी जळगावात दाखल झाले होते. त्यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मदत करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सहाय्यक पोलीस फौजदार विजयसिंग पाटील व पोलीस हवालदार अक्रम शेख यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने मेहरुण परिसरात आरोपी अझहर खाटीक याचा शोध घेतला. खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद पोलीस आयुक्तालय (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अटकेमुळे तेलंगणा पोलिसांना त्यांच्या गुन्ह्यातील एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या