Thursday, May 7, 2026
Homeखानदेशकेंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची अंदमान व निकोबार येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलला...

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची अंदमान व निकोबार येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलला भेट

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची अंदमान व निकोबार येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलला भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

अंदमान व निकोबार I प्रतिनिधी

आज अंदमान व निकोबार बेट येथील दौऱ्यानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भारत माताचे महान सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी ज्या ऐतिहासिक कालापाणी सेल्युलर जेल मध्ये ठेवले होते तेथील कोठडीला भेट देऊन वीर सावरकरांना अभिवादन केले.

सेल्युलर जेल येथे भेट दिली असता स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या वीर जवान व स्वातंत्र्यसैनिकांनी किती मोठे बलिदान दिले आहे याची प्रचिती येत असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले

श्री विजय पुरम, अंदमान व निकोबार येथे जय हिंद पदयात्रा मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी…

भारत मातेचे महान सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिवस निमीत्त आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज श्री विजय पुरम, अंदमान व निकोबार द्वीपसमूह येथे जय हिंद पदयात्रा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व माय भारत व्हालुंटियर सोबत सहभागी झाल्या.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या