Thursday, May 7, 2026
Homeक्राईमअमळनेरमध्ये दोन तरुणांकडून गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त; पोलिसांची धडक कारवाई

अमळनेरमध्ये दोन तरुणांकडून गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त; पोलिसांची धडक कारवाई

अमळनेर : अमळनेर-चोपडा रस्त्यावर गुरुवारी (२८ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास अमळनेर पोलिसांनी सापळा रचून दोन संशयित तरुणांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आसाराम बापू आश्रमाजवळ ही कारवाई करण्यात आली. यात विशाल भैय्या सोनवणे (१८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भीमा भिल (३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) या दोघांना पकडण्यात आले.

दोघांकडे शस्त्र परवाना नसताना बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल आणि काडतुसे ठेवलेली आढळली. मध्यरात्री ३ वाजता आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या