Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हाशौर्यवीर ढोल-ताशा पथकाचा वाद्यपुजन सोहळा उत्साहात संपन्न

शौर्यवीर ढोल-ताशा पथकाचा वाद्यपुजन सोहळा उत्साहात संपन्न

शौर्यवीर ढोल-ताशा पथकाचा वाद्यपुजन सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव- शौर्यवीर प्रतिष्ठान संचलित वाद्यपथकाचा 5 वा वाद्यपुजन सोहळा रविवार दि. 01 जुन 2025 रोजी नुतन मराठा महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून* आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अनिल जोशी, नायब तहसिलदार रूपालीताई काळे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, दिलीप नाझरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

शौर्यवीर ढोल-ताशा पथकात 105 मुले तर 55 मुली असे एकुण 160 वादकांचा समावेश असून मागील 5 वर्षापासून दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती आदी उत्सवात सदर पथक आपली प्रस्तुती देत असतो.
*मराठी अस्मिता व पारंपारिक वाद्याविषयीचे प्रेम आजच्या युवा पिढीमध्ये तेवत रहावे या हेतुने शौर्यवीर पथकाचे कार्य अविरत सुरू आहे.

शौर्यवीर पथकात सामील होण्यासाठी चिन्मय नाझरकर (9028320472) यांच्याशी संपर्क साधावे.

ताज्या बातम्या