Sunday, June 15, 2025
Homeक्राईमवृद्ध महिलेच्या पर्समधून अज्ञात महिलेने लांबवली सोन्याची पोत!

वृद्ध महिलेच्या पर्समधून अज्ञात महिलेने लांबवली सोन्याची पोत!

वृद्ध महिलेच्या पर्समधून अज्ञात महिलेने लांबवली सोन्याची पोत!

जळगाव, ३ जून :l प्रतिनिधी जळगाव बस स्थानक ते नवीपेठ मार्गावर रिक्षाने प्रवास करत असताना एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पर्समधून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात महिलेने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. लिलाबाई ताराचंदजी टाटिया (वय ६५, रा. सुशिला नगर, साक्री, जि. धुळे) या आपल्या बहिणी व वहिनीसोबत दागिने दुरुस्तीसाठी नवीपेठेतील महावीर ज्वेलर्सकडे जात होत्या.

बस स्थानकावर रिक्षात बसताना त्यांच्यासोबत एक अनोळखी महिला देखील बसली. महावीर ज्वेलर्स येथे पोहोचल्यानंतर लिलाबाई यांनी पर्स तपासली असता, पर्सची चैन उघडी आणि २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घटनेनंतर लिलाबाई यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वीरेंद्र शिंदे करत आहेत.

ताज्या बातम्या