जळगाव (प्रतिनिधी) : फिल्डवर प्रत्यक्ष काम करणारा शिक्षक, प्राचार्य, संस्था, अधिकारी-कर्मचारी व संशोधक यांच्या कामाची दखल घेवून विद्यापीठाने त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले असल्यामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्तींची जबाबदारी अधिक वाढली आहे असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यगौरव सोहळ्यात ते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे यांची उपस्थिती होती. या समारंभात सन २०२२-२३ या वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये / परिसंस्था / प्रशाळा, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक तसेच उत्कृष्ट मूल्यांकन प्रकल्प राबविणारे महाविद्यालये व समन्वयक यांना पुरस्कार देण्यात आले.
विद्यापीठाच्या अधिसभा गृहात झालेल्या या समारंभात डॉ. के.बी. पाटील म्हणाले की, शासनाकडून विद्यापीठांना पुरेसे सहकार्य मिळत नसतांना विद्यापीठाने पुढे येवून प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची दखल घेवून पुरस्कार दिले आहेत ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. आपल्याकडे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांपेक्षा नियंत्रण करणाऱ्यांना अधिक महत्व दिले जाते. विद्यापीठांकडे शासकीय यंत्रणा ज्या पध्दतीने पाहते त्याचा पुर्नविचार करण्याची गरज आहे. विद्यापीठांची स्वायत्तता संकुचित होत असल्याचे भिती व्यक्त करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी विद्यापीठे आणि संस्था यांना स्वातंत्र्य दिले जावे अशी अपेक्षा डॉ. के.बी. पाटील यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठ व महाविद्यालये यांच्यात परस्पर संवाद अधिक महत्वाचा आहे. कॅम्पस आणि वर्गात विद्यार्थी यावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षकांना काळाच्या ओघात बदलावे लागेल आणि प्राचार्यांना सर्व शैक्षणिक घटकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी लागेल असे मत व्यक्त केले. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे महत्व देखील त्यांनी अधोरेखीत केले. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी तयार रहावे असे ते म्हणाले.
प्रारंभी उपस्थितांना विद्यापीठाचा माहितीपट दाखविण्यात आला. हा माहितीपट ब्रीज कम्युनिकेशन, जळगाव यांनी तयार केला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वीणा महाजन व डॉ. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद प्रा. अनिल डोंगरे, प्रा. म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील हे उपस्थित होते.
उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व संशोधक पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे
उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था – १) शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित, आर.सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर, जि. धुळे आणि जी.एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजि. अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव संयुक्त पणे (व्यावसायिक), २) तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (अव्यावसायिक), आदर्श विद्यापीठ प्रशाळा – १) रासायनिक शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, उत्कृष्ट प्राचार्य – प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सुर्यवंशी (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब सुरेश पाटील महाविद्यालय, चोपडा), उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) – १) डॉ. अनिल बारी (बोदवड महाविद्यालय, बोदवड) २) डॉ. विेवेकानंद चटप (एच. आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ) प्रा. डी.एच. मोरे (रसायन शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग -१) – इंजि. राजेश पाटील (विद्यापीठ उपअभियंता, बांधकाम विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -३) – १) रामानंद बऱ्हाटे (वरिष्ठ सहायक, संगणक केंद्र), २) संतोष गव्हाळे (लघुलेखक, सभा व दप्तर विभाग), ३) श्रीमती जयश्री देशमुख (सहायक, प्रशासन विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -४) १) राजेश अवचारे (से.नि. शिपाई), २) बलभिम गिरी (कुशल परिचर, आरोग्य केंद्र), दैनिक वेतनिक विद्यापीठ उत्तेजनार्थ १) समाधान पाटील (जनसंपर्क विभाग), २) भरत चौधरी (कुलसचिव कार्यालय), उत्कृष्ट अधिकारी (महाविद्यालय वर्ग -२) – संजय बागुल (रजिस्ट्रार, (एच. आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -३) -१) राजेंद्र कदम (कनिष्ठ लुघुलेखक, किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा), २) सुनील पाटील (मुख्य लिपीक, पंकज कला महाविद्यालय, चोपडा), ३) गोपीचंद पाटील (अधिक्षक, सि.गो. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साक्री), ४) जितेंद्र शिरसाठ (लिपीक, एच.आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा., शिरपूर), ५) कु. मीना शहा (वरीष्ठ लिपीक, डी.एच. अग्रवाल कला, श्रीरंग अवधुत वाणिज्य व सी.सी. शहा- एम.जी.अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, नवापूर) उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -४) – १) नारायण बोबडे (प्रयोगशाळा परिचर, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा),२) रवींद्र अहिरे (प्रयोगशाळा परिचर, गिताबाई महाजन कला, केशरीमल नवलखा वाणिज्य व मनोहरशेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर), ३) अंकुश गायकवाड (शिपाई, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे), ४) दिनेश झिने (ग्रंथालय परिचर, संत जगनाडे महाविद्यालय, खापर, जि. नंदुरबार)
विद्यापीठ शिक्षकांसाठी प्रकाशन पुरस्कार १) प्रा. एस.एन पाटील (पर्यावरणशास्त्र प्रशाळा), २) प्रा.पी.पी. माहुलीकर (रसायनशास्त्र प्रशाळा) ३) डॉ. वंदना शिंदे (भौतिकशास्त्र प्रशाळा) ४) डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था), ५) डॉ.विकास गीते (रसायनशास्त्र प्रशाळा),६) प्रा. आर.एस. बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा),७) डॉ. सतीश पाटील ( जैवशास्त्र प्रशाळा), ८) प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था), ९) डॉ. दीपक दलाल (रसायनशास्त्र प्रशाळा), पेटंट पुरस्कार – १) प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था) २) प्रा. आर.एस. बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा), ३) डॉ. एस.आर. कोल्हे (संगणकशास्त्र प्रशाळा) महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (प्रकाशन ) – १) डॉ. चंद्रगौडा पाटील (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) २) डॉ. लक्ष्मीकांत झंवर (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ३) डॉ. अतुल शिरखेडकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ४) डॉ. उज्वलदीप देवरे (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ५) डॉ. लालचंद पटले (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), ६) डॉ. सौरभ खडसे (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ७) डॉ. सौरभ गणोरकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ८) डॉ. हितेंद्र महाजन (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ९) डॉ. मोहन कळसकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १०) डॉ. शैलेश चालिकवार (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ११) डॉ. कैलास मोरावकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १२) डॉ. प्रवीण पाटील (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १३) डॉ. हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १४) डॉ. गौरव धडसे (जी.एच. रायसोनी इन्स्टि., जळगाव). पेटंट पुरस्कार – १) डॉ. मधुचंद्र भुसारे (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), २) डॉ. संजयकुमार बारी (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ३) डॉ. अक्षय घोरपडे (गिताबाई महाजन कला, केशरीमल नवलखा वाणिज्य व मनोहरशेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर ), ४) डॉ. हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ५) डॉ. लालचंद पटले (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), ६) डॉ. शैलेश चालिकवार (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ७) डॉ. कैलास मोरावकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ८) डॉ. मोहम्मद रागीब मोहम्मद उस्मान (शरदचंद्रीका पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा), ९) ) डॉ. सौरभ गणोरकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर)
उत्कृष्ट केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प राबविणारे महाविद्यालये व समन्वयक (जळगाव जिल्हा) – १) पु.ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, समन्वयक – डॉ. बी.एच. बऱ्हाटे (पु.ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ), २) लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर, समन्वयक – डॉ. सचीन राणे (लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर), ३) किसान महाविद्यालय, पारोळा, समन्वयक – प्रा. अनिरूध्द देवरे (किसान महाविद्यालय, पारोळा), ४) धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, समन्वयक – प्रा. मारोती जाधव (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर), ५) यशोदाबाई सराफ कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव, समन्वयक – प्रा. कुंदन इंगळे (यशोदाबाई सराफ कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव) (धुळे जिल्हा) – १) आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर, समन्वयक -डॉ. संजय बच्छाव (आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर) २) एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर, समन्वयक – प्रा. संदीप सोलंकी (एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर), २) झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे, समन्वयक – डॉ. डी.के. पाटील (झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे) (नंदुरबार जिल्हा) – १) पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा, समन्वयक – प्रा. विशाल भोसले (पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा), २) जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार, समन्वयक – डॉ. स्वप्नील मिश्रा (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) ३) जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार, समन्वयक – डॉ. आनंत देशमुख (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार)