Sunday, June 15, 2025
Homeक्राईमविटांनी भरलेल्या डंपरने तरुणाला चिरडले! 

विटांनी भरलेल्या डंपरने तरुणाला चिरडले! 

विटांनी भरलेल्या डंपरने तरुणाला चिरडले! 

एक जण गंभीर, ममुराबाद रस्त्यावरील घटना

जळगाव प्रतिनिधी

विटांनी भरलेल्या डंपरने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी वरील मास्टर कॉलनी येथील राहणारा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी दहा वाजता ममुराबाद रस्त्यावर घडली.

 

फैसल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र वासीक खान युसुफ खान (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,फैसल आणि वासीक हे दोघे दुचाकीने जळगावहून महाविद्यालयाकडे जात होते. ममुराबाद रस्त्यावर समोरून येणाऱ्या विटांनी भरलेल्या मालवाहू वाहन (क्रमांक एमएच १३ एएन ४४४५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला, तर वासीक गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच फैसलचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. फैसल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मास्टर कॉलनी परिसरात. हळहळ व्यक्त होत आहे.या या अपघाताबाबत पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या