Friday, June 13, 2025
Homeताज्या बातम्यालक्षात आहे ना!.. आई बहिणीवरून शिव्या दिल्यास पाचशे रुपये दंड ! ;...

लक्षात आहे ना!.. आई बहिणीवरून शिव्या दिल्यास पाचशे रुपये दंड ! ; ‘या गावाने केला ग्रामसभेत ठराव मंजूर

अहिल्यानगर (वृत्तसंस्था) ;- आई बहिणीच्या नावाने शिवीगाळ करणाऱ्या ग्रामस्थांना पाचशे रुपये दंडाचा ठराव नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत ने घेतला असून गावात बालकामगार दाखविल्यास एक हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले असल्याची माहिती गावाचे सरपंच  शरद आरगडे यांनी दिली. शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरद आरगडे यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत समोर मोठ्या फलकाद्वारे लक्षात आहे ना शिवी दिल्यास  पाचशे रुपये दंड येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान सौंदाळा ग्रामस्थांनी विविध विषय ठरावात मंजूर करून समाजात एक चांगला संदेश देत आदर्श निर्माण केला असल्याने या गावाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडिया, मोबाइलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने पालकांनी त्यांना यापुढे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला,

यावेळी  बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा असे घोषवाक्य ठेवून  बालकामगार दिसून आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल. गावात बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामसभेत ठरले.

यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे, उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आडागळे, कावेरी आढागळे यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.

ताज्या बातम्या