Friday, June 20, 2025
Homeखानदेशराष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनला 'स्टार परफॉर्मर' पुरस्कार

राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडलाIN (इंजीनियरींग एक्स्पोर्ट प्रोमोशन काउन्सील ऑफ इंडीया) ईईपीसी इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि साहित्य (अॅग्रीकल्चर मशिनरी अॅण्ड पार्टस लार्ज एन्टरप्राईजेस कॅटगीरी) मोठे उद्योग श्रेणीमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी प्रतिष्ठित स्टार परफॉर्मर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात वाढीसाठीच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जैन इरिगेशनला मिळाला. जागतिकस्तरावर कृषी तंत्रज्ञानात नावीन्य, गुणवत्ता व उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनची वचनबद्धता अधोरेखित करणारा हा पुरस्कार आहे. शाश्वत कृषी उपाय आणि निर्यात उत्कृष्टतेमध्ये कृषी नव उपक्रमांना चालना देण्यासाठीजैन इरिगेशनचे स्थान आणखी मजबूत करणारा हा पुरस्कार म्हणता येईल. दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे बैंकिंग व वित्त विभागाचे उपाध्यक्ष पियुष कुमट व संजय शर्मा यांनी जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चहा यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती होते.

ताज्या बातम्या