Monday, July 7, 2025
Homeखानदेशराज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: पुढील ५ वर्षांत वीजदरात २६% कपात!

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: पुढील ५ वर्षांत वीजदरात २६% कपात!

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: पुढील ५ वर्षांत वीजदरात २६% कपात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्स’वरून माहिती

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात आगामी पाच वर्षांत वीजदर टप्प्याटप्प्याने २६ टक्क्यांनी कमी होणार आहेत. ही कपात पहिल्या वर्षी १० टक्क्यांनी सुरू होणार असून, पुढील चार वर्षांत हळूहळू आणखी कपात केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदर कपात करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. महावितरणच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) दिलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.”

सर्व वर्गातील ग्राहकांना लाभ

मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, या निर्णयाचा घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यातील ७० टक्के ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात, त्यामुळे या ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत दर कपातीचा थेट फायदा होईल.

“पूर्वी दरवाढीच्या याचिकाच दाखल केल्या जात असत. मात्र यंदा पहिल्यांदाच महावितरणने दर कपात करण्यासाठी याचिका दाखल केली. त्या पार्श्वभूमीवर एमईआरसीने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे,” असेही फडणवीस यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या