मोठी बातमी : अखेर धनंजय मुंडे यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला
मुंबई वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. शेवटी आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती.