जळगाव शहरातील मेहरून परिसर मध्ये असणाऱ्या त्रिवेणी महादेव मंदिराजवळ पार्किंगला लावलेली बोलेरो पिकअप मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याची घटना गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री नऊ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विजय सिताराम वंजारी (वय-५०) रा. कुंभारवाडा मेहरून जळगाव हे आपले परिवारासह वास्तव्याला असून खाजगी वाहन चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची मालवाहू पिकअप गाडी क्रमांक (एमएच ४६ ई ४२२७) त्रिवेणी महादेव मंदिराजवळ पार्किंगला लावलेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही वाहन चोरून नेले.