Friday, June 13, 2025
Homeक्राईममेहरुण परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

मेहरुण परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

मेहरुण परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

जळगाव l प्रतिनिधी शहरातील मेहरुण भिलाटी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल संजय पवार असून तो मेहरुण भिलाटी परिसरातील रहिवासी आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवार, २७ मे रोजी माहिती मिळाली होती की, विशाल पवार हा पाण्याच्या हौदाजवळ गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या थांबलेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर एलसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा गावठी लोखंडी कट्टा व मॅगझीन जप्त करण्यात आले.

या प्रकरणी विशाल पवार विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आणि प्रदीप चवरे यांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या