Sunday, June 15, 2025
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात पुन्हा कोरोना धडकी भरवणारा! ठाण्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतही अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना धडकी भरवणारा! ठाण्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतही अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना धडकी भरवणारा! ठाण्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतही अलर्ट

जळगाव, दि. २४ मे २०२५: जागतिक पातळीवर पुन्हा वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या आणि सिंगापूर-हॉंगकॉंगमधील १४,००० हून अधिक रुग्णांमुळे चिंता वाढली असताना, महाराष्ट्रातही धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात २१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.मुंब्रा येथील या तरुणाला २२ मे २०२५ रोजी उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि २३ मे रोजी त्याचा अहवाल सकारात्मक आला. दुर्दैवाने, २४ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कोरोनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आहे.

मुंबईतही २४ तासांत ३५ नवे रुग्ण
मुंबईतही कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, गेल्या २४ तासांत ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी केईएम रुग्णालयातही दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या महिनाभरात राज्यात १७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.जागतिक चिंता: सिंगापूर-हॉंगकॉंगमध्ये रुग्णसंख्या वाढली
सिंगापूर आणि हॉंगकॉंगमध्ये १४,००० हून अधिक रुग्ण आणि काही मृत्यूंमुळे जागतिक चिंता वाढली आहे. परदेशी पर्यटकांमुळे भारतातही रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात दीपक सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस नियोजनाची मागणी केली आहे. “लोकांमध्ये क्वॉरंटाईनची मानसिकता नाही, त्यामुळे नवे पर्याय शोधावे लागतील,” असे सावंत यांनी नमूद केले.मुंबई महापालिका सतर्क: विशेष खाटा, कक्ष तयार
कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सतर्क झाली आहे. सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष खाटा आणि कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच, बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.सावधानतेचा इशारा
कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत असल्याने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या