मुंबई/नागपूर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी हा मुंबई पार पडण्याची शक्यता असताना आता मंत्रिमंडळ विस्तार शपथ सोहळा उपराजधानी नागपुरात दुपारी ४ वाजता ३५ ते ४० मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
भाजप आणि गृहखात्यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेतील कोंडी फुटत नसल्यामुळे विस्तार सतत लांबणीला पडत आहे. आता हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात रविवारी दुपारी ४ वाजता राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देतील, महायुतीत २१, १२, १० असा मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यानुसार, रविवारी भाजपचे १७ ते १८, तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या कोट्यातील सर्व मंत्री शपथ घेऊ शकतात, तर भाजप आपल्या कोट्यातील २ ते ३ मंत्रीपदे रिक्त ठेवेल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्याकडे गृह आणि अर्थखाते ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला नगरविकास आणि महसूल खाती, तर राष्ट्रवादीला सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खाते सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस झाले आहेत. मात्रएकनाथ शिदे यांची नाराजी कायम असल्याने मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या, मात्र शिदेची नाराजी कायम असल्याने बहुचर्चित विस्तार होऊ शकला नाही.
कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार?
भाजप गृह, अर्थ किया महसूल, ऊर्जा, जलसंपदा, जलसंधारण, उच्च व तंत्रशिक्षण, ग्रामविकास, पर्यटन, आदिवासी विकास, वने, सास्कृतिक कार्य, कौशल्य विकास, आरोग्य वैद्यकीय शिक्षण, बहुजन कल्याण विकास, सामाजिक न्याय, रोहयो, फलोत्पादन, सामान्य प्रशासन, विधी व न्याय
*शिवसेना* नगरविकास, जलसंपदा किंवा एमएसआरडीसी, उद्योग, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, शालेय शिक्षण, पणन,
*राष्ट्रवादी* अर्थ किंवा सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, आदिवासी किंवा अन्न व औषधी प्रशासन, मदत पुनर्वसन, कीडा व युवक कल्याण
मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावे आणि पक्ष
भाजप: चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, विजयकुमार गावित, आशिष शेलार किया योगेश खगर, संभाजी निलंगेकर, संजय कुटे, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राहुल आहेर, गोपीचंद पडळकर, नितेश राम, राहुल कुल.
शिवसेना: दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, प्रकाश आबिटकर,
राष्ट्रवादी: छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, मकरंद पाटील, अनिल पाटील ,दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे किंवा राजू नवघरे, माणिकराव कोकाटे किंवा संग्राम जगताप,