Thursday, April 16, 2026
Homeक्राईमभरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

कुसुंबा गोशळेतजवळील घटना

जळगाव प्रतिनिधी 

कुसुंबा येथील गोशाळेत जवळून पायी जाणाऱ्या 81 वर्षीय वृद्धाचा भरधाव रिक्षाने दिलेल्या धडके त मृत्यू झाल्याची घटना 24 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडले असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनोहर बाबुराव जोशी (वय ८१, रा. साई सिटी कॉलनी, कुसुंबा) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील साई सिटी कॉलनीत राहणारे मनोहर जोशी हे गावातील शंकर पार्वती मंदिरात पुजारी म्हणून सेवा करीत होते. दरम्यान, सोमवारी दि. २४ रोजी सकाळी ११. ३० वाजता मनोहर जोशी हे गोशाळेजवळून पायी जात असतांना त्यांना अज्ञात भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली. वृद्धाला धडक दिल्यानंतर रिक्षा चालक तेथून पसार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. जखमी मनोहर जोशी यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, मनोहर जोशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या