Thursday, April 16, 2026
Homeखानदेशबहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी Í शहरातील सागर पार्क येथे गुरुवारी  बहिणाबाई महोत्सवाला उत्साहाने प्रारंभ करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तिपर गीते, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शो यांसारख्या कार्यक्रमांची रेलचेल असून, शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत.

पहिल्याच दिवशी खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धांचा देखील उत्साही प्रतिसाद मिळाला. उद्घाटन प्रसंगी पोलीस महानिरीक्षक डॉ. सुपेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील, शैलेश मोरखडे, मनोहर पाटील, प्रशांत कोठारी, कुशल गांधी, सपन झुनझुनवाला, सेवानिवृत्त कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सूर्यवंशी, शैला चौधरी, सचिन महाजन, मोहित पाटील, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, कृष्णा चव्हाण, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, विक्रांत चौधरी, मंगेश पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले, तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी आपल्या कलांचे सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली.

आयोजकांनी जाहीर केले की, उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना बहिणाबाई पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

आजच्या खास कार्यक्रमाची उत्सुकता
आज सायंकाळी सात वाजता अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेते कुशल बद्रीके यांच्या सहभागाने ‘चला हवा करुया’ या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची उत्सुकता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या