Saturday, November 15, 2025
Homeक्रीडाफुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद

फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद

फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद
जळगाव — आईडीएसएसएच्या एफ-झोन अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगाव येथे फुटबॉल या क्रीडा स्पर्धेचे दि. २३ जानेवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातून ८ संघ सहभागी झाले.


उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. पराग एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान, सर्व संघांचे संघ व्यवस्थापक इत्यादी उपस्थित होते.

अंतिम सामन्यात गोदावरी तंत्रनिकेतनने जामिया पॉलिटेक्निक अक्कलकुवा संघाला ३-२ गोल करुन पराभूत केले व अंतिम विजेतेपद पटकवले. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडुंना लाभले. पंच म्हणून प्रा. विजय निकम, प्रा. पंकज तिवारी, प्रा. वसीम शेख, तौसिफ खान, सादिक अली यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान, कार्यक्रम समन्वयक प्रा. चंद्रकांत शिंपी व प्रा.दीपेश भुसे तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील (सदस्य) आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या