Friday, June 13, 2025
Homeक्राईमपैसे न दिल्याच्या रागातून पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला; पत्नी गंभीर जखमी

पैसे न दिल्याच्या रागातून पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला; पत्नी गंभीर जखमी

पैसे न दिल्याच्या रागातून पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला; पत्नी गंभीर जखमी

जळगाव, प्रतिनिधी: नशेसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शहरातील राजीव गांधी नगरात घडली. ही घटना ११ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीव गांधी नगरात वास्तव्यास असलेल्या संगिता रमेश झेंडे (वय ५०) यांच्यावर त्यांचे पती रमेश बाबासाहेब झेंडे यांनी हल्ला केला. रमेश झेंडे यांनी नशेसाठी पत्नीला पैसे मागितले. मात्र, संगिता यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या रमेश यांनी प्रथम लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि त्यानंतर धारदार कोयत्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केले.

या घटनेनंतर संगिता झेंडे यांनी थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी रमेश झेंडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.

ताज्या बातम्या