Sunday, June 15, 2025
Homeखानदेशनूतन मराठा महाविद्यालयातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने बनवला ड्रोन

नूतन मराठा महाविद्यालयातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने बनवला ड्रोन

नूतन मराठा महाविद्यालयातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी बनवला ड्रोन
छोटेखानी फवारणी यंत्र बसवून पिकावर फवारणी करता येईल हा मूळ उद्देश
जळगाव प्रतिनिधी

नूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नूतन गोल्डन सायन्स बॉईज या उपक्रमात अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील राज भोई या विद्यार्थ्याने यूट्यूब व गुगलवर सर्च करून ड्रोन बनवला .

हा ड्रोन का बनवला असं राज भोई या विद्यार्थ्याला विचारले असता त्याने सांगितले की शेतात फवारणी करण्यासाठी मजूर मिळत नव्हते व फवारणी करताना वापरला जाणाऱ्या त्या औषधांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो त्या अनुषंगाने त्याच्यावर छोटेखानी फवारणी यंत्र बसवून पिकावर फवारणी करता येईल हा त्याचा ड्रोन बनवणारा मागचा उद्देश होता.

त्याने निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल .पी .देशमुख यांनी राज भोई या विद्यार्थ्यांचा सत्कार केला . भविष्यात ड्रोन मॉडी फाय करण्यासाठी जो पण खर्च येईल तर महाविद्यालयातर्फे करण्यात येईल असे सांगितले .

हा ड्रोन बनवण्यासाठी सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर. बी. देशमुख यांचे त्याला मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील डॉ.के. बी. पाटील, तसेच ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील , जूनियर व सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या