Wednesday, December 10, 2025
Homeखानदेशनिवडणुकांसाठी भाजपचे जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारी जाहीर ; जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून...

निवडणुकांसाठी भाजपचे जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारी जाहीर ; जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ना. संजय सावकारे

निवडणुकांसाठी भाजपचे जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारी जाहीर ; जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ना. संजय सावकारे

जळगाव शहर प्रमुख आ, राजूमामा भोळे, जळगाव पूर्व (रावेर) नंदू महाजन तरजळगाव पश्चिमचे प्रमुख आ. मंगेश चव्हाण

मुंबई प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. जळगाव शहराचे प्रमुख आ. राजूमामा भोळे, जळगाव पूर्व (रावेर) चे नंदू महाजन व प्रभारी मंत्री संजय सावकारे, तसेच जळगाव पश्चिमचे प्रमुख आ. मंगेश चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

घोषित यादीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख प्रमोद जठार तर प्रभारी नितेश राणे असतील. रत्नागिरी उत्तरचे प्रमुख विनय नातू व प्रभारी निरंजन डावखरे, तर रत्नागिरी दक्षिणचे प्रमुख अतुल काळसेकर व प्रभारी रामशेठ ठाकूर यांची निवड झाली आहे. रायगड उत्तरचे प्रभारी प्रशांत ठाकूर, रायगड दक्षिणचे प्रभारी सतिश धारप, ठाणे शहराचे प्रमुख संजय केळकर, तसेच ठाणे ग्रामीणचे प्रमुख कपिल पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

भिवंडीसाठी महेश चौघुले, मीरा-भाईंदरसाठी प्रमुख नरेंद्र मेहता व प्रभारी गणेश नाईक, नवी मुंबईसाठी संजीव नाईक, कल्याणसाठी नाना सूर्यवंशी, उल्हासनगरसाठी प्रदीप रामचंदानी, तसेच वसई-विरारसाठी प्रमुख राजन नाईक व प्रभारी डॉ. हेमंत सावरा यांची नियुक्ती झाली आहे. पालघर जिल्ह्याची जबाबदारी बाबाजी काठोळे, नंदुरबारसाठी प्रमुख विजय चौधरी व प्रभारी रक्षा खडसे, तर धुळे शहरासाठी अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणसाठी कुणाल पाटील व प्रभारी जयकुमार रावल अशी नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिक शहराचे प्रमुख राहुल ढिकले, नाशिक उत्तरचे डॉ. राहुल आहेर, नाशिक दक्षिणचे गिरीश पालवे व प्रभारी गिरीश महाजन, मालेगावचे प्रमुख दादा जाधव,

अहिल्यानगर शहराचे प्रमुख विक्रम पाचपुते, अहिल्यानगर उत्तरच्या प्रमुख नेहलता कोल्हे व प्रभारी राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर दक्षिणचे प्रमुख सुजय विखे पाटील, पुणे शहराचे रघुनाथ कुलकर्णी, पुणे उत्तर (मावळ) चे राम सातपुते, पुणे दक्षिण (बारामती) चे सचिन कल्याणशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे धैर्यशील कदम, सोलापूर शहराचे जयकुमार गोरे, सोलापूर पूर्वचे राम सातपुते, सोलापूर पश्चिम (माढा) चे सोनल कल्याणशेट्टी, तर साताऱ्याचे प्रभारी शिवेंद्रराजे भोसले असतील.

 

ताज्या बातम्या